Parbhani :- परभणी तालुक्यातील राहाटी ,पिंपरी देशमुख, आलापुर पांढरी या गावा पासून जात असलेल्या पुर्णा नदीच्या पात्रातून रात्री वाळू उपसा व वाहतूक होत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल विभागाकडून (Revenue Division) दुर्लक्ष केले जात आहे.असे असले तरी मात्र ताडकळस पोलिसांच्या वतीने पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करावी अशी मागणी होत आहे.
वाळू चोरट्यांना कारवाई ची भीतीच राहिली नाही
परभणी तालुक्यातील राहाटी ,पिंपरी देशमुख, आलापुर पांढरी या गावा पासून जात असलेल्या पुर्णा नदीच्या पात्रातून रात्री बे रात्री वाळू उपसा व वाहतूक होत आहे. ताडकळस पोलिसांच्या वतीने अवैध वाळू (Illegal sand) उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर ताडकळस पोलिसांच्या वतीने कारवाई सुरू आहेत.मात्र महसूल प्रशासनाचे पुर्णा नदीच्या पात्रातून होत अवैध वाळू उपसा व वाहतूक कडे दुर्लक्ष का केले अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे आहे. पुर्णा नदीच्या पात्रातून रात्री बे रात्री वाळू उपसा व वाहतूक होत आहे. अवैध रेतीचा गोरखधंदा खुलेआम चालू असून प्रशासनाला यावर उपाय म्हणून कोणतेही कायदेशीर कार्यवाहीचे लसीकरण होत नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसापासून अवैध रेतीवाहतुक मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा चालू आहे. महसूल प्रशासनाकडून अमावस्या पौर्णिमा ला एक-दोन नाममात्र कार्यवाही केल्या आसल्या तरी प्रशासनाच्या या थातुरमातुर कार्यवाहीवर रेती माफियांनी आपला गोरखधंदा थांबवायला तयार नाहीत.
प्रशासनाचा रेतीमाफियांना बाहेरून पाठींबा आहे का?
यामुळे प्रशासनाचा रेतीमाफियांना बाहेरून पाठींबा आहे का? अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. एक दोन गाड्या पकडत पोकळ कार्यवाही करून मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला हा गोरखधंदा दिसत नाही का? की कार्यवाहीचे बळ उरले नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यामुळे अवैधरित्या चालणा-या रेतीच्या धंद्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलास फटका बसला आहे. वाळू उपसावर बंदी असतानाही पुर्णा नदीच्या पात्रातून रात्री बे रात्री अवैध उपसा व वाहतुकीने थैमन घातले आहे. परंतु याकडे महसूल विभागाचे लक्ष नाही का? यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर ताडकळस पोलिसांच्या वतीने कारवाया सुरू आहेत. पुर्णा नदीच्या पात्रातून रात्रभर शासनाचा महसूल बुडवून वाळू टिपर्याच्या साह्याने वाहतूक केली जात आहे.कोणाच्या अर्थपूर्ण संबंधातून ही अवैध वाळू वाहतूक सुरू आहे का?अ सा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून पुर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत वाहतूक करण्यात येत आहे.
मात्र,वाळू माफियांच्या अवैध वाहतूक व वाळू उपश्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.मात्र सर्रास सुरू असलेला वाळू उपसा व वाहतूक महसूल विभागाच्या लक्षात येत नाही की सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे,हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे.शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करण्याचा हा गोरखधंदा सध्या फोफावताना दिसत आहे.अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुर्णा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करावी अशी मागणी होत आहे.