रिसोड तालुक्यातील पेन नदीतील अवैध रेती उपशाने झाली चाळण..!
रिसोड (Revenue Department) : तालुक्यातील मसालापेन, देगांव, पेनबोरी येथून पैनगंगा नदीपात्रातील रेती रात्रीच्या वेळी काही ठराविक ट्रॅक्टर द्वारे चोरी केली जात आहे. दिवसभर मजूरद्वारे रेतीचे उत्तखंनन केले जाते. व रात्री च्या वेळी रेतीचा उठाव करून रात्रीच रेती वाहतूक करण्यात येते. यावेळी नदीपात्रात येणाऱ्या सर्व मार्गांवर पंटर उभे करण्यात येतात. सदर रेती चोरटे लागतच्या शेतकऱ्याच्या शेती पण कोरत आहेत. सदर रेती चोरटे हे दहशत निर्माण करून संबंधित शेतकऱ्यांना धमक्या देतात. त्यामुळे त्यांची तक्रार करायला कोणी धजावत नाही.
मसालापेन येथील दोन पूल आणि कोल्हपुरी बांधऱ्याच्या मनाई क्षेत्रातून मोठया प्रमाणात रेती उतखणान झालेले आहे. तर पेनबोरी देगांव येथे ही तीच परिस्थिती आहे. महसूल विभागाने (Revenue Department) सदर रेती माफिया समजणाऱ्यांना वेळीच वचक बसविणे आवश्यक आहे.