मानोरा(Washim):- तालुक्यातील अरुणावती व धावंडा नदी व मोठया नाल्यामधुन मोठया प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करुण चढया दराने छोटे बांघकाम करणाऱ्या गरजू सामान्य विक्री होत आहे, अवैध रेती उपसा करून सामान्य नागरीकांची लुट करणाऱ्या माफीयाकडे मात्र याकडे महसुल व पोलीस प्रशासन अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याची चर्चा जागरूक नागरिकांमधून होत आहे.
अवैध रेती उपसा करणारे मोठया प्रमाणात सक्रीय
तालुक्यात सिंचन विहीर व पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेची मोठया प्रमाणात बांधकाम (Construction) सुरू असुन त्याचे बांधकाम करण्यासाठी रेतीची गरज आहे . हीच बाब हेरुन अवैध रेती उपसा करणाऱ्यानी योजनेअंतर्गत बांधकाम करणाऱ्या सामान्य नागरीकांना चढया दराने सहा हजार रुपये ब्रास रेतीची विक्री करुन लुट चालविली आहे. तालुक्यातील अरूणावती नदी धावड व पुस नदी असुन यापैकी एकाही नदीच्या रेती घाटाचा लीलाव झाला नाही. त्यामुळे अवैध रेती उपसा करणारे मोठया प्रमाणात सक्रीय झाले असुन दिवसा पहाटे व रात्री रेतीची ट्रॅक्टरने(tractor) रेती घाटावरून रेतीचा उपसा करून वाहतूक (Transportation) सुरू आहे. या अवेध रेती उपसा करणाऱ्यानी तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात महत्वाच्चा ठीकाणी मोठे नेटवर्क उभारले असुन रात्र भर अवैध रेतीची वाहतुक करुन मोठया प्रमाणात उपसा चालवीला आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने योजनेमधील बांधकांम करणाऱ्या शेतकरी व नागरीकांची आर्थिक लुट सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अरूनावती , धावडा व पुस नदीपात्र व नाल्यातून रात्रीच्या वेळी रेती उपसा ट्रॅक्टरने चोरीने वाहतूक राजरोस सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.