चिखली (Buldhana) :- पाच नोव्हेबर रोजी सकाळी भरधाव वेगाने जातं असलेल्या एका टिप्पर(Tipper) अचानक टायर फुटले, त्यामुळे चालकाने टिप्पर मधील अवैध रेती रोडवरच खाली करून टाकावी लागली होती. या घटनेची माहिती तहसिलदार डोंगरजाळ मॅडम यांना दिली असता त्यांनी अधिकाऱ्यांना रेती जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु तहसीलदार मॅडम यांचे आदेशाची धाबेवरच वाळू माफिया सोबत तडजोड होवून अवैध रेती गायब करून टाकली.अशा या प्रकारामुळे दे राजा महसूल प्रशासनावर प्रश्न चिन्ह उमटले आहेत.
वाळू उपसा नदी पात्र हे अंढेरा पोलीस स्टेशनंच्या हद्दीत आहे
तहसील कार्यालय दे राजा अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे वाळू उपसा नदी पात्र हे अंढेरा पोलीस स्टेशनंच्या हद्दीत आहे. या नदी पात्रातील रेती ही चांगल्या दर्जाची असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमानावर अवैधरित्या रेतीची अवैध वाहतूक होते. मात्र शासनाने गेल्या काही वर्षा पासून खडकपूर्णा नदी पात्रातील रेतीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शासनाकडून लिलाव नसल्याने लोकांना बाधकामासाठी रेती मिळत नाही याच्याच गैरफायदा घेत वाळू माफिया हे अधिकारी कर्मचाऱ्यांना हप्ते देवून नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून भरदिवसा गावो गावी टिप्पर च्या वाहनाने वाहतूक करतात आणि लोकांना अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करतात. हा प्रकार थाबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सक्तीचे आदेश देवून अवैध वाळू वाहतुकीवर कार्यवाही (Proceedings) करण्याचे सूचित केले होते. त्यामुळे चिखली तहसिलदार व दे राजा तहसीलदार आणि अंढेरा पोलिसांनी कडक कार्यवाह्या करून वाळू माफियाना चांगलाच घाम आणून सोडला होता. तरी सुध्दा वाळू माफिया हे कोणालाही काहीही न घाबरता हप्ते देवून वाटेल तो मार्ग आपणांवून रेतीची अवैध वाहतूक करत आहेत.
तडजोड करणारे कर्मचारीही लवकरच उघडकीस येणार असल्याने मोठी खळबळ
असाच एक प्रकार 5 नोव्हेबर रोजी सकाळी एक टिप्पर सुसाट वेगाने अंढेरा गावाकडून मेरा बु गावाकडे रोडने जात असतांना अचानक गावाच्या काही अंतरावर टिप्परचे टायर (Tyre) फुटले आणि आता आपल्यावर मोठी कार्यवाही होऊन दंड(Fine) पडू शकतो हे पाहून चालकाने रोडवरच टिप्पर मधील रेती खाली करून टाकली. आणि टिप्पर रोडच्या बाजूला नेवून उभे केले हा प्रकाराची माहिती दे राजा तह लसीलदार डोंगरजाळ मॅडम यांना फोन वरून दिली. त्यातच काही शासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून तोडजोडही केली. मात्र तहसीलदार मॅडम यांनी जप्तीचे आदेश दिल्याने रेती वाहकाकडून शासनास दंड भरून घेतल्या जाणार आहे. त्याचं बरोबर तडजोड करणारे कर्मचारीही लवकरच उघडकीस येणार असल्याने मोठी खळबळ उडाली होती . या अगोदरही अवैध रेती उत्खनन संदर्भात वारंवार सांगूनही अधिकाऱ्याकडून पंचनामे करून कारवाई होत नव्हती. कर्तव्यात हेतू पुरस्कार टाळाटाळ केल्या जातं असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात होते. परंतु आता तहसीलदार मॅडम यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रेती जप्त करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले होते मात्र दिवसभरातच वाळू माफी्यांनी रेती माफिया सोबत तडजोड करीत रेती उचलून घेऊन गेले.
त्यामुळे तहसीलदार मॅडम याचे आदेश धाबेवर बसून तडकोड झाली ही तडजोड तहसिलदार यांच्या आदेशा वरून झाली असेल अशी चर्चा सुरु झाली यात कोण कोण सामील आहेत हे लवकरच जनतेसमोर उघडकीस येईल. कारवाई होऊ शकली नसल्यामुळे बेकायदेशीर वाळू माफी्यांचे मनोबल उंचावले आहे.