पुसद (Pusad):- पुसद तालुक्याची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने सुरू असून शहरामध्ये वाढती लोकसंख्या व नोकरीनिमित्त बाहेरगावी अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी राहत आहेत. तर शहरांमध्ये शासकीय निमशासकीय अनेक विकास कामे सुरू आहेत. तर खाजगी बांधकामे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याकरिता बांधकाम साहित्याची मोठी मागणी शहरामध्ये वाढली आहे. याचाच फायदा घेत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांची संख्या पण मोठी वाढली आहे.
पुसद शहरात अवैध गौण खनिज वाहतुकीचे धावतात भरधाव वेगाने
कमी वेळेत जास्त पैसे या व्यवसायात मिळत असल्यामुळे व्यवसायामध्ये राजकीय कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी संख्या दिसत आहे. शहरामध्ये रेतीचे अवैध (invalid) अनेक ठिये तयार झालेले दिसत आहेत. तर या ठिय्यावरून शहरात अंतर्गत रेतीची काळया, पिवळ्या व मुरूम ठब्बर ची वाहतूक करणारे डुगे हे भरधाव वेगाने धावत आहेत. ही अवैध्य रेतीची वाहतूक करणारी वाहने शहरात लावण्यात आलेल्या सिग्नलला (Signal)ही जुमानत नाहीत . तर शहरातील अनेक वार्डातून सदर वाहनाचे चालक वेगावर कुठलाही नियंत्रण न ठेवता या गाड्या पळवीत आहेत. त्यामुळे गल्लीबोळात राहणारे लहान लहान मुले महिला वयोवृद्ध त्यांचा जीव धोक्यात आला आहे. एकांदा भीषण अपघात व घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक गुन्हे शाखेने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे
पुसद महसूल प्रशासनाचे(Revenue Administration) उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्यासह पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या पथकास सुद्धा हे प्रकार दिसत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह सहवास यांना पडला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळणे नव्हे तर काय? असे पुसदकरांना वाटत आहे. आता तरी या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाने स्थानिक गुन्हे शाखेने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.