रात्रभर सुरू असलेली अवैध रेतीची वाहतूक मोबाईलमध्ये कैद
देशोन्नती वृत्त संकलन
चिखली/बुलढाणा (Illegal sand transport) : -अवैध रेतीच्या वाहतुकीवर कडक निर्बंध आहेत तसेच गेल्या आठ दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामुळे वाळू माफियाकडून रात्रभर मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक (Illegal sand transport) केली जात आहे . हा प्रकार शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद करत प्रशासनाच्या (District administration) अधिकाऱ्यांना कळविले मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे वाळू माफिया समोर जिल्हा प्रशासन हतबल झाल्याची चर्चा उमटत आहे.
चिखली तालुक्यातील इसरुळ गावा लगत खडकपूर्णा प्रकल्पाचे मोठे मोठा नदी प्रकल्प आहे . या नदी पात्रातून दररोज मोठया प्रमाणावर वाळू माफिया हे अवैध रेतीची वाहतूक करतात. या अवैध वाहतूकीवर पायबंद घालण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून कार्यवाह्या करत आहे. मात्र कार्यवाही होवूनही अवैध रेतीची वाहतूक बंद होत नाही उलट बंदच्या नावाखाली मोठया प्रमाणावर (sand mafia) अवैध रेतीची वाहतूक होते. त्यातच आता गेल्या पाच ते सहा दिवसा पासून महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने वाळू माफिया रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करत आहेत.
हा प्रकार इसरुळ येथील माजी सरपंच पती तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे वाहने थांबवून निषेध नोंदविला असल्याने महसूल अधिकारी यांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते .तरी सुध्दा (sand mafia) वाळू माफिया हे कोणालाही न जुमानता दररोज अवैध रेतीची वाहतूक करत आहेत हा प्रकार १८ जुलै रोजी संतोष भुतेकर यांनी मोबाईल मध्ये कैद करून उघडकिस आनला आणि अवैध रेतीची वाहतूक बद्दल माहिती महसूल विभागाचे अधिकारी यांना दिली मात्र काम बंद आंदोलन सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाणे टाळले. त्यामुळे आता (District administration) महसूल विभागाचे अधिकारी वाळू माफिया समोर हतबल झाल्याने रेतीची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू झाली आहे. मात्र या प्रकारामुळे लोकांना अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागत आहे.