परभणी/पाथरी (Illegal sand) : गोदावरी पात्रातून अवैध (Illegal sand) रित्या उत्खनीत केलेली वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना कारवाई केली असुन जप्त वाहने (Tehsil Office) तहसील कार्यालय येथे लावली आहेत. मंगळवारी व बुधवारी या कारवाई करण्यात आल्या. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे टिप्पर हे अवैध रेती वाहतुक करतांना उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना आढळुन आले.
उपविभागीय अधिकारी यांची कारवाई
सदरील वाहनामध्ये अंदाजे ०३ ब्रास रेती आढळुन आल्याने वाहन जप्त करण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या दरम्यान निवळी निवळी येथे दुसरी कारवाई करण्यात आली. यावेळी अंदाजे १ ब्रास अवैध (Illegal sand) रेती वाहतुक करतांना एक ट्रॅक्टर आढळुन आला. याही वाहनारस जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहनावर नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया करण्यात आलेली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गोदावरी किनारी भागात मोठ्या कारवाईची गरज
दरम्यान तलाठी, मंडळ अधिकारी तसेच (Tehsil Office) तहसिल कार्यालय स्तरावर स्थापन करण्यात आलेले पथक यांना एका बैठकीमध्ये (Illegal sand) अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्याच्या सुचना केले. सदरील वाहनांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मर्डसगाव , उमरा , गुंज ,गौंडगाव , डाकूपिंप्री , लिंबा या गोदावरी पट्यातील गावात व किनारी भागातील शेतात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू साठे केले. उत्खनन ही सुरूच आहे. त्यामुळे महसुल प्रशासनाकडून मोठ्या कारवाईची गरज आहे.
डाकूपिंप्री च्या तलाठ्यावर प्रशासन मेहरबान का ?
पोहेटाकळी सज्जाचे तलाठी अरविंद चव्हाण यांना मागील एक वर्षापासून गाव सज्जाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तालुक्यात नवीन तलाठ्यांच्या नियुक्त झाल्या असताना अरविंद चव्हाण यांचा अतिरिक्त असणारा पदभार काढून घेत त्या ठिकाणी नवीन तलाठी नियुक्ती का केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कोणत्याही (Tehsil Office) तलाठ्याला अतिरिक्त पदभार देता येत नसताना त्याच्यावर प्रशासनाची मेहरबानी दिसून येत आहे. डाकू पिंपरी गावामध्ये मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात (Illegal sand) अवैध वाळू उत्खनन होत असताना व यापूर्वी या गावांमध्ये अनेक वेळा अवैध वाळूसाठे प्रशासनाला सापडलेले असताना सदरील तलाठी यांना या ठिकाणावरून का काढण्यात येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.