तेल्हारा (Illegal sand transport) : शहरातील भागवत मंगल कार्यालय रोडवरून अवैधरीत्या गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन मुद्देमालासह पळवून नेणार्या चालक आरोपीविरुद्ध घटनेच्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११:४२ वाजेदरम्यान (Telhara Police) तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये महसूल अधिकारी लक्ष्मीकांत कांतीलाल चौरे तेल्हारा यांच्या (Illegal sand transport) तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महसूल अधिकारी लक्ष्मीकांत चौरे तेल्हारा हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी भागवत मंगल कार्यालय रोडने जात असताना (Illegal sand transport) ट्रॅक्टर हेड क्रमांक नसलेला लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ५७५ ट्रॉली क्रमांक एमएच २८ एएस १७३२ गौण खनिज रेतीने भरलेला आढळला. चालक आरोपी राहुल अनिल मोरे रा. तेल्हारा यास परवानगी व पास बाबत विचारणा केली असता त्याने परवानगी व पास नसल्याचे सांगितले. त्यामुळे महसूल अधिकारी यांनी मदतनीस मंडळ अधिकारी एस.एस. साळवे यांना बोलावले.
ट्रॅक्टर पोलिस स्टेशनमध्ये घेण्यास सांगितले असता चालक आरोपीने सदर ट्रॅक्टर इंदिरा नगर येथे पळवून नेला व रफिक बेग मुकद्दर बेग यांचे घराजवळ रस्त्यावर रेती खाली करून वाहनांसह पोबारा केला. सदर ठिकाणी रेतीच्या ढिगाचा पंचनामा करून माजी नगरसेविका आरती गजानन गायकवाड यांना सुपूर्द नाम्यावर दिला. शासकीय मालमत्ता (Illegal sand transport) रेती चोरी वाहन पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना दुपारी ४:४० वाजी दरम्यान घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस २०२३ कलम ३०३ (२), २२१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली (Telhara Police) तेल्हारा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.