जिंतूर (Illegal sand transport) : तालुक्यातील निलज येथील पूर्णा नदीतुन रेती उपसा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लिलाव झाले नसताना (Revenue Department) प्रशासनाच्या आशीर्वादाने बोट व जेसीबीच्या साहाय्याने बिनदीक्त अवैद्य रेती उपसा चालू आहे. जिंतूर तालुक्यात मागील वर्षी पासून एकही रेती घाटाचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी रेती माफिया सक्रिय झाले आहेत. यामध्ये सावळी, वझर, ईटोली, डिग्रस आदी गावातील रेती घाटातून (Illegal sand transport) अवैद्य रेतीचे उत्खनन मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
निलज येथील पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात उत्खनन
या अवैद्य रेती उपशामुळे कोणत्याही प्रकारचा (Revenue Department) महसूल सरकारला मिळत नाही मात्र सरकारी बाबूना मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याचे चर्चा नागरिक करत आहेत यामुळे महसूल पोलीस यंत्रणा अवैद्य रेती उत्खनाकडे दुर्लक्ष करत आहे असाच प्रकार निलज येथील नदीवर दिसून आला. यामध्ये बोट व जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैद्य राजरोसपणे रेती उपसा करण्यात येत आहे याबाबत गावातील नागरिकांनी (Revenue Department) प्रशासनाला माहिती देऊनही कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे
सुट्टीचे दिवस पाहून उपसा
महसूल विभागला (Revenue Department) शनिवार व रविवार दिवशी सुट्टी राहते. यामुळे रेती माफियानी अवैद्य रेती उपसा करण्याची शक्कल लढवली आहे शिवाय एखाद्या नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी फोन केला तर ऑफिसच्या वेळेत बघू असे सांगितले जाते