परभणी/गंगाखेड(Parbhani):- गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणारा टिप्पर शनिवार रोजीच्या मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास पकडून रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे टिप्पर चालकाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
2,07,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
गंगाखेड तालुक्यातील नरळद ते रावराजूर दरम्यान गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना वाळू(sand) उपसा करून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने शनिवार रोजीच्या मध्यरात्री उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस शिपाई संदिप गित्ते, चव्हाण आदींनी रविवार दि. १ डिसेंबर रोजीच्या १:३० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शहानिशा करून पाहणी केली असता अंदाजे अडीच ब्रास वाळू भरलेला एमएच २४ एयु २४०५ क्रमांकाचा टिप्पर मिळून आल्याने चालकाचे नाव विचारले असता भगवान लिंबाजी शिंदे रा. रावराजूर असे सांगितले. अडीच ब्रास वाळूसह टिप्पर असा एकुण 2,07,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पो. शि. संदिप गित्ते यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.