हिंगोली/औंढा ना. (Illegal sand transport) : अवैध रेती वाहतुक केल्याने महसुलच्या पथकाने दोन वाहने जप्त केली. ९ फेब्रुवारी रविवार रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशान्वये आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जून्या बायपास कारवाडी परिसरात अवैध गौण खनिज पथक प्रमुख विनोद गादेकर यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करत असताना एक टिप्पर पकडून तहसील कार्यालयच्या प्रांगणात लावण्यात आले.
या (Illegal sand transport) कारवाई दरम्यान सय्यद अयुब मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सय्यद अब्दुल, मंजुषा हटकर, बांगर, जाधव, लोंढे, व पोलिस निरीक्षक डोंगरे व सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, महसूल सेवक मुस्ताक शेख, शेख माजीद, गोरले, पोलीस पाटील माने, किशोर यादव व इतर कर्मचारी या कारवाईमध्ये उपस्थित होते. जवळा बाजार पुरजळ रोडवर शिक्षक कॉलनी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार पूरजळ रोडवर शिक्षक कॉलनी परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज दिनांक ८ फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकाने पाठलाग करून पकडले व सदरील ट्रॅक्टर एक ब्रास वाळू सह औंढा नागनाथ तहसील कार्यालय आवारात आणून लावण्यात आले आहे. सदरील (Illegal sand transport) ही कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुरेश बोबडे, ग्राम महसूल अधिकारी सुवर्णमाला शिरसाट, ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल शेळके, ए. एस. भांगडे, ज्योती स्वामी, केशव जगताप, अश्वजीत गुदाडे, जमादार सिद्दिकी यांच्या पथकाने केली आहे.