माहूर (Mahur) Nanded:- तालुक्यातील मौजे पडसा येथील पैनगंगा नदी पात्रात दि.१९ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अवैध रेती वाहतूक (Illegal sand transport) करीत असल्याची खबर गौण खनिज पथकास मिळाल्याने त्यांनी साह्यक जिल्हाधिकारी (assistant collector) कावली मेघना यांच्या मार्गदर्शनात पथक घटनास्थळी रवाना होऊन पडसा पैनगंगा नदीपात्रातून महसूल पथकाने एक हायवा, दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर व जेसीबी (JCB) जप्त केला आहे. या धाडसी कार्यवाही ने अवैध रेती उत्खनन करणार्यात चांगलीच खळबळ उडाली आहे
एक हायवा दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर व जेसीबी जप्त
दि.१९ रोजी राञी ११ वाजेच्या सुमारास पडसा येथील पैनगंगा नदीपाञात अवैध रेती उत्खनन होत असल्याची माहिती गौण खनिज पथकास मिळाली सदर माहिती आधारे पडसा येथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळील (bridge)नदीपाञात छापा टाकून एक हायवा दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केला कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पथकाने सावधगिरी बाळगत माहुर व सिंदखेड पोलिसांना (police)पाचारण केले होते सदरील वाहाने पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात जमा करण्यात आले माहुर तालुक्यातील पहील्याच धाडसी कार्यवाहीत प्रभारी डॉ तहसिलदार (tahsildar) राजकुमार राठोड, नायब तहसिलदार कैलास जेठे, मंडळ अधिकारी व्हि के पाईकराव, जी बी कावडगावे संदीप फुलारी, तलाठी सी पी बाबर, व्ही पी राजुरवार व पवन बेहेरे पोलीस पाटील यांचा समावेश होता.