अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात प्रशासन अधिक सतर्क!
पातूर (Illegally Rice Selling) : आज सकाळी 8.30 वाजता माननीय तहसीलदार पातूर (Tehsildar Patur) यांना भ्रमणध्वनीवर मिळालेल्या माहितीनुसार वनदेव पांगरताटी या गावात सकाळी 10.30 वाजता आकस्मिक भेट देण्यात आली. या कारवाईदरम्यान, देऊळगाव साकासा (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील रहिवासी व रेशन कार्डधारक लाभार्थी (Ration Beneficiaries) शेख अफजल शेख निसार हा खुल्या जागेत अवैधरित्या तांदूळ विकत (Selling Rice Illegally) घेत असताना रंगेहात पकडण्यात आला.
सदर आरोपीकडून सुमारे 5.90 क्विंटल (सुमारे 12 चुमड्या) तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन चान्नी (Police Station Channi) येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. तहसीलदार पातूर यांच्या अध्यक्षतेखाली प्र. निरीक्षण अधिकारी विनीत ताळे, प्रमोद घोगरे व पराग खंडारे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अन्नधान्य वितरण (Distribution of Food Grains) व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात प्रशासन (Administration) अधिक सतर्क झाले आहे.