केंद्रीयमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
बुलढाणा (Prataprao Jadhav to the Collector) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करावे व पंचनामे करतेवेळी विमा कंपनी कृषी विभाग आणि महसूल विभागअंतर्गत समन्वय साधून एकही बाधित शेतकरी नुकसानी पासून वंचित राहणार नाहीत त्याची खबरदारी घ्या, असे निर्देश केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
2 आणि 3 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस (Heavy rain) झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मुंग उडीद मका पिके उध्वस्त झाली आहेत तर अनेक गावे बाधित झाली आहेत. बुलढाणा चिखली खामगाव नांदुरा शेगाव मोताळा मेहकर लोणार या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे. पंचनामे करतेवेळी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कमर्चाऱ्यांमध्ये समन्वय साधून एकही बाधित शेतकरी नुकसानीच्या पंचनामेपासून वंचित राहणार नाही. पंचनामे झाल्यानंतर एक प्रत शेतकऱ्यांना द्यावी या संदर्भातील नियोजन आपल्यास्तरावरून करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.