अमरावती(Amravati):- अमरावती येथील लग्न समारंभ (wedding ceremony)आटोपून गावी परत जात असतांना संजय गांधी नगर स्मशानभूमी नजीक रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकी वाहनाने जबर धडक(hit) दिल्याने सावर्डी येथील अंगणवाडी सेविका सयाबाई धनराज मेश्राम (५५) या गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.
पाय फ्रॅक्चर असून व मेंदूला दुखापत झाल्याचे निष्पन्न
सयाबाई मेश्राम यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले होते मात्र त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खा.बळवंत वानखडे यांनी सयाबाई मेश्राम यांचे जावई राहुल उके यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली शिवाय डॉक्टरांना सुद्धा लक्ष देण्याची विनंती केली. सयाबाई मेश्राम उजवा पाय फ्रॅक्चर (fracture) असून व मेंदूला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची तक्रार (complaint) फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन ला देण्यात आली सदर अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुलगी ॲड. शुभांगी मेश्राम यांनी केली.