हिंगोली (Hingoli):- सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय राऊत यांच्यावर मध्यंतरी प्राणघातक हल्ला (Assault) झाला होता. तसेच त्यांचे वाहनही जाळण्यात आले होते. ही घटना हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीमध्ये घडलेली असताना गुन्ह्यातील आरोपीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. या प्रकरणाबद्दल २७ ऑगस्टला अॅड. विजय राऊत यांनी कुटूंबासह जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानासमोर आमरण उपोषण सुरू केले. परंतु या दरम्यान त्यांनी पोलिसांची प्रतिमा जनमाणसात मलीन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय राऊत यांच्यावर मध्यंतरी अज्ञात आरोपितांनी हल्ला करून त्यांना जखमी केले होते. काही दिवस ते उपचारासाठी रुग्णालयात (Hospital)दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे वाहनही जाळण्यात आले होते. आरोपींकडून वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने त्यांनी या पूर्वी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच या प्रकरणात २७ ऑगस्टला पोलिस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. अॅड. विजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील काही जण उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्याला सदनशिर मार्गाने आपली मागणी मांडावी असे सांगुनही त्यांनी पोलिसांचे कोणतेही न ऐकता पोलिस मुर्दाबाद, पोलिस भाडोत्री स्वरूपात काम करतात.
अॅड. विजय राऊत यांचे कुटूंबासह पोलिस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन
तसेच पोलिस अधिक्षकांना मिळणार्या शासकीय सुविधाबाबत व पोलिसांकडून गुन्हे ओपन होणारच नाहीत असे जोरजोराने ओरडून पोलिसांची प्रतिमा जनमाणसात मलीन करून बदनामी केली. तसेच त्यांना पोलिस समजावून सांगत असताना त्यांनी अटकाव निर्माण केल्याने विक्की उरेवार यांनी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विजय ज्ञानबा राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहीता सह कलम ०३ पोलिसांप्रती अप्रतीची भावना, निर्माण, चेतावणी अधिनियम सन १९२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय राऊत यांनी कुटूंबासह दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केले ही जिल्ह्यातील पहीलीच घटना मानली जात आहे.