कोरपना (Chandrapur):- आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी आज १३ सप्टेंबर बुधवार ला गडचांदूर शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये
दि १६/०९/२०२४ रोजी ईद. ए. मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती), व दि. १८/०९/२०२४ ला गणेश विसर्जन सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राखणे संबंधाने पोलिस स्टेशन गडचांदुर येथे आज रोजी सकाळी १०. ३० वाजता रवींद्र जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर, तसेच ठाणेदार शिवाजी कदम तसेच उपविभागातील गडचांदुर येथील १३ पोलिस अधिकारी, व ९६ पोलिस अंमलदार, तसेच २४ आरसीपी (RCP)पथक चंद्रपुर, राज्य राखीव बल गट क्र.१५ गोंदिया येथील ३ अधिकारी, व पोलिस अंमलदार ४९, असे एकुण- अधिकारी १६ व पोलिस अंमलदार-१४७ याचे उपस्थितीत रुट मार्चमा पोलिस स्टेशन गडचांदुर-छत्रपती शिवाजी महाराज, चौकातून भ्रमन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-बस स्टॉप चौक-सविधान चौक बाबुराव शेडमाके चौक – महात्मा फुले चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवण चौक- गांधी चौक परत पोलिस स्टेशन गडचांदुर येथे पोहचून १२ वाजता रूट मार्च चे समापन करण्यात आले.