हिंगोली (Hingoli) :- महाराष्ट्र भाजपा गट नेतेपदी देवेंद्र फडणविस(Devendra Fadnavis) यांची निवड जाहीर होताच 4 नोव्हेंबर बुधवार रोजी हिंगोली येथील गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या (BJP)वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच भव्य आतिषबाजी करत निवडीचे स्वागत केले.
देवेंद्र फडणविस यांची निवड जाहीर होताच आनंदोत्सव साजरा
याप्रसंगी माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे , माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, शहराध्यक्ष कैलास काबरा, मिलींद यंबल, सखाराम इंगळे,माणिक लोंडे उमेश गुट्टे, श्याम खंडेलवाल, राजेश अग्रवाल, शरद जयस्वाल, अंकुश जयस्वाल, आशिष शर्मा, कृष्णा डोके, रजनीश पुरोहित, उत्तमराव जगताप, गुड्डू देवकते, शिवशंकर होकर्णे, दिनेश बगडिया, दीपक शेट्टी, कैलाश शहाणे, बळीराम मुटकुळे, संजय मांडगे, रितेश शहाणे, निनाजी कांडेलकर, नंदू खिल्लारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.