हजारो युवक, महिला, पुरुषांचा मोर्चात सहभाग; बाजारपेठेत शुकशुकाट
परभणी (Parbhani):- बांगलादेशात हिंदू समाजावर (Hindu society) होणार्या अन्याय, अत्याचार घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी परभणीत सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट हिंदू मोर्चा काढण्यात आला. शनिवार बाजार मैदानाहून काढण्यात आलेल्या मोर्चात धर्मगुरुसह हजारो हिंदू युवक, महिला, पुरुष सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध धर्मगुरुंनी मनोगत व्यक्त करुन बांगलादेशातील घटनांचा निषेध केला.
हिंदू समाजाच्यावतीने विराट हिंदू मोर्चा
गेल्या काही दिवसापासून बांग्ला देशात सत्तांतर झाल्याने अराजकता माजली आहे. हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्तांचे नुकसान करुन हिंदूवर प्राणघातक हल्ले होत आहेत. महिलांवर अमानवी अत्याचार (Torture) होत आहेत. हिंदू मंदिरांची (Hindu Temple)तोडफोड केली जात आहे. हिंदूच्या मानवाधिकारांचे हनन करणार्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मंगळवार १० डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्यावतीने बंदची हाक देऊन विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी शनिवार बाजार मैदानापासून हिंदुचा विराट मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, स्टेशनरोड मार्गे निघालेल्या मोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विसर्जन होऊन सभेत रुपांतर करण्यात आले.
कठोर शब्दात बांगलादेश सरकारला जाब विचारुन कठोर पावले उचलावीत
यावेळी झालेल्या विविध धर्मगुरुंनी बांग्लादेशात (Bangladesh) हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे व मंदिराचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दात बांगलादेश सरकारला जाब विचारुन कठोर पावले उचलावीत, इस्कॉनचे चिन्मयकृष्ण महाराज आणि त्यांच्या सहकारी, तसेच इतर हिंदू धर्माचार्यांची सुटका करावी, बांग्ला देशात हिंदूवर होणार्या अन्याय, अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालावा, अल्पसंख्याक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबवण्यासाठी योग्य पावले उचलावीत, भारत सरकारने(Government of India) यासंदर्भात जाहिरपणे आपले मत प्रदर्शित करावे, आदी मागण्या करत बांगलादेशातील हिंदूवर होणार्या अन्याय, अत्याचारांच्या घटनांचा निषेध केला.
या मोर्चात जैन मुनी मोक्षतिलक विजयजी, डॉ. धनंजय पुरी, भागवताचार्य बाळू महाराज असोलेकर, माधव घोडके, स्वामी अद्वैत चैतन्य, हभप पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, आदींसह आ.डॉ. राहूल पाटील, डॉ. विवेक नावंदर, अनिल डहाळे, संदीप भंडारी, अरविंद देशमुख, दिलीप गिराम, अंबिका डहाळे, प्रशांस ठाकूर, आनंद भरोसे, सुरेश भूमरे आदींसह हजारो सकल हिंदू समाज बांधव सहभागी होते. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.