उदगीर (Udgir):- बदलापूर लैंगिक अत्याचार(sexual harassment) घटनेच्या निषेधार्थ उदगीर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी (दि.21) तहसील कार्यालयापुढे तीव्र निदर्शने (severe symptoms) करण्यात आली.
राज्य सरकारच्या निष्कियतेचा निषेध नोंदवत घोषणाबाजी
यावेळी राज्य सरकारच्या (state government) निष्कियतेचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना यावेळी निवेदन देऊन आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना (Shivsena)तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात अरुणाताई लेंडणे महिला आघाडी संपर्क प्रमुख, श्रीमंत सोनाळे पाटील वि.स प्रमुख, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, जमिरोद्दीन मलंग शहर संघटक, उपतालुकप्रमुख महेश फुले-मनोज पातील, विष्णूभाई चिंतालवार, अरुण बिरादार, लक्ष्मीकांत गुडमेवार, मुन्ना पांचाळ, श्याम तवर, तातेराव मुंडे, अश्विन चव्हाण, ओम ददापुरे, अमोल बिरादार, बालाजी वरदाळे, राहुल शेळाले, सावरगावे राजू, अविनाश गायकवाड, एकनाथ गवते, विकास आडे, केदासे समाधान, राजकुमार होळे, अरविंद रेकुलवाड, निलेश विभूते, गौतम कांबळे, महिला आघाडी सरोजा बिरादार, ज्योती फुलारी, सुनीता फुलारी, अनिता गायकवाड, धोंडूबाई वाघमारे, सुरेखा शिर्के, ज्योती गायकवाड, अहिल्याबाई सूर्यवंशी, शेवंतां गायकवाड, चंद्रभागा जाधव, सुप्रिया कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.