लातूर (Latur):- येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या(Government Medical Colleges) परिसरात असलेल्या बाथरूममध्ये एक स्त्री जातीचे अर्भक सापडले असून याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूरच्या आपत्कालीन विभागाचे वैद्यकीय (Emergency Department Medical)अधिकारी डॉ. कृष्णा राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, शनिवार १४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या जुन्या इमारतलगत परिसरात सुरक्षा रक्षक पाहणी करत असताना दिव्यांगासाठी असलेल्या बाथरूममध्ये एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यावरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आढळून आलेल्या अर्भकाचे शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.Crime