Parbhani:- परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीने यांनी तोडफड केली होती. या नंतर 11 डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनेच्या वतीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनं दरम्यान काही ठिकाणी जाळपोळ व दगड फेकीच्या घटना घडल्या. याच घटनेतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडी दरम्यान 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये आर्थिक मदत
झालेला घटनाक्रम लक्षात घेता संविधान प्रेमी आंबेडकरी जनतेच्या मनात रोष आहे. त्या अनुषंगाने आज पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या मध्ये पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची(Combing operation) न्यायालयीन चौकशी करावी, दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबास सरकारने तातडीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, जखमी भीम सैनिकांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावे, न्यायालयीन कोठडीत(Judicial Custody) असलेल्या, व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे, लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये आर्थिक मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी देवून पुनर्वसन करावे, या सह अन्य मागण्या आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.