परभणी/गंगाखेड(Parbhani):- एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस लॉजवर नेऊन अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दि. ३१ ऑगस्ट शनिवार रोजी ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गंगाखेड सखोल चौकशी करून लॉज चालक व मालक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
लॉज चालक व मालकाविरुद्ध कारवाईची मागणी
गंगाखेड तालुक्यातून शिक्षणासाठी शहरात येत असलेल्या एका नववी वर्गातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गंगाखेड शहरातील श्याम लेवडे वय २१ वर्ष (रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड) या तरुणाने जवळीक साधत दि. ३० ऑगस्ट रोजी ही अल्पवयीन मुलगी खाजगी शिकवणी करून गावाकडे जात असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास श्याम लेवडे याने तिला बस स्थानकासमोरील आनंद लॉजमध्ये नेऊन तिला चॉकलेट (Chocolate) खायला देत तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी तरुणास ताब्यात घेऊन अटक करत दि. ३१ ऑगस्ट रोजी गंगाखेड येथील न्यायालयासमोर (Courts) हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. ३ सप्टेंबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंगाखेड शहरातील तरुणाला आंबट चाळे करण्यासाठी लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉज चालक व मालकांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत असताना पोलीस लॉज चालक व मालकावर काय कारवाई(action) करणार याकडे शहर व तालुका परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बेशुद्ध अवस्थेतील अल्पवयीन मुलगी रुग्णालयात
खाजगी शिकवणी करून गंगाखेड शहरातून गावी जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीस श्याम लेवडे या तरुणाने बस स्थानक परिसरातील आनंद लॉजवर रूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी बेशुध्द(unconscious) झाली तेंव्हा श्याम लेवडे याने तिला उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून शिकवणीला जातांना तिला चक्कर आल्याचे सांगितले यावर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी व अमजद खान पठाण यांनी त्याची सविस्तर माहिती जाणून घेत पोलीसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर आदींनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन तरुणास ताब्यात घेत गुन्हा दाखल करून घेत त्यास अटक केली आहे.
लॉज चालक, मालकाविरुद्ध कारवाई करावी
कमी वेळात अधिक पैसा मिळविण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुली, तरुणांसह महिला व पुरुषांना आंबट चाळे करण्याकरिता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉज चालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शहरासह तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.