अकोला (Patur):- पातूर तालुक्यातील सस्ती ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक ९ डिसेंबर २०२४ रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत मीनाक्षी गजानन डाबेराव यांची अविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, आणि त्याला कुठलाही विरोध न होता मीनाक्षी डाबेराव विजयी झाल्या.
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मीनाक्षी डाबेराव यांची अविरोध निवड
सस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी असलेली जागा एसटी (Scheduled Tribe) साठी राखीव होती. सस्ती ग्रामपंचायतीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत, त्यापैकी आठ सदस्य निवडणुकीत गैरहजर (Absent)होते, तर पाच सदस्य उपस्थित होते. निवडणुकीची प्रक्रिया सकाळी ११ वाजता नामनिर्देशन घेऊन सुरू झाली. दु. २.४५ वा. निकाल जाहीर करण्यात आला. मीनाक्षी डाबेराव यांच्या अविरोध निवडीसाठी सर्व उपस्थित सदस्यांनी सहमती दर्शवली. या निवडणुकीमध्ये निवडणूक
सत्याचा विजय झाला सुनील बंड ग्रामपंचायत सदस्य सस्ती आज सस्ती ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच म्हणून प्रथमच निवडून आल्यात याचा मला अभिमान आहे.
सर्व नियम आणि प्रक्रिया नुसार पारदर्शकपणे झाली
मी ४ वर्षापासून जिल्हाधिकारी अकोला आयुक्त अमरावती उच्च न्यायालय (High Court)नागपूर सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे प्रयत्न केलेत आणि हे निवडणूक लागावी म्हणून प्रयत्न केलेत आज अखेर माझ्या प्रयत्नाला फळ मिळाले आणि ही निवडणूक पार पडली. निर्णय अधिकारी म्हणून पातुरचे निवडणूक नायब तहसीलदार अजय तेलगोटे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक एस. बी. घोडके, तलाठी जयश्री टेके, तलाठी धम्मपाल नकाशे, मंडळ अधिकारी नरेंद्र बढेरे यांनी देखील आपापली जबाबदारी पार केली. निवडणूक शांततेत पार पडली. सर्व नियम आणि प्रक्रिया नुसार पारदर्शकपणे झाली. मीनाक्षी डाबेराव यांच्या विजयामुळे सस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर एक नविन नेतृत्व पुन्हा उभे राहिल्याने ग्रामपंचायतीत विकासाच्या नव्या वळणाची आशा व्यक्त केली जात आहे.