मानोरा (Manora):- बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नवरात्र उत्सवाच्या घटस्थापना दिनी दि. ३ ऑक्टोंबर रोजी गुरुवारी कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तथा यवतमाळ – वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Guardian Minister Sanjay Rathore ) यांच्या हस्ते बंजारा विरासत पटांगणात सेवा ध्वजरोहण करण्यात आले.
तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस दौऱ्यावर
पोहरादेवीत घट स्थापना दिवशी गुरुवारी पालकमंत्री ना संजय राठोड यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम देवी आई भवानी जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज व संत डॉ रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन बंजारा विरासत नंगारा म्युझियम प्रांगणात हजेरी लावली. यावेळी धर्मगुरु बाबुसिंग महाराज व महंत मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आज शनिवारी ५ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) नव रात्रौ उत्सवाच्या पर्वावर देवी जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी येत आहे.
त्यांचे सोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील व राज्यातील कॅबिनेट, राज्य मंत्री, खासदार, आमदार आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्याची अंतिम तयारी झाली असुन प्रशासन पंतप्रधान यांच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे. तिर्थक्षेत्र पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस येण्याच्या अगोदर विशेष हेलिकॉप्टरने हवाई पथकाने प्रात्यक्षिक करून पाहणी केली. तसेच केंद्र, राज्य शासनाचे उच्च पदस्थ सनदी अधिकारी, आमदार व खासदार हे कार्यक्रम स्थळी भेट देवून पाहणी केली