महाराष्ट्र बंद:- महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या(sexual harassment) विरोधात विरोधी पक्षांनी बंदची घोषणा केली आहे. हे प्रकरण शुक्रवारी (२३ ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात(Bombay High Court) पोहोचले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (MVA) बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंदमुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांसह सर्वसामान्यांना त्रास होणार आहे.
काय म्हणाले सरकारी वकील?
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल डॉ.बीरेंद्र सराफ यांनी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे न्यायालयात सांगितले. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, जर याबाबत नियम असेल आणि सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी निर्देश दिलेले असतील, तर मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय?