नांदेड(Nanded):- गुरूग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे आज २१ जूनला १० आंतरराष्ट्रीय योग दिवस, केंद्रीय आयुष मंत्रालय(Union Ministry of AYUSH), जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा(District Sports) अधिकारी कार्यालयामार्फत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, शाळकरी विद्यार्थी, विविध योगाभ्यासी मंडळे व संस्थांची सदस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयमार्फत हे आयोजन करण्यात आले होते.