पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे समाज बांधवांना आवाहन
मानोरा (Banjara Heritage Museum) : बहुजन बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे साकारण्यात आलेल्या (Banjara Heritage Museum) बंजारा विरासत नंगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते येत्या ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मानोरा येथील माहेश्वरी भवन येथे दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित सहविचार सभेत केले.
या बंजारा विरासत नंगारा (Banjara Heritage Museum) लोकार्पण सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील मंत्रीगण, धर्मगुरु, महंत, साधुसंत आदिंची उपस्थिती राहणार आहे. पुढे सहविचार सभेला संबोधित करताना ना. राठोड (Sanjay Rathod) म्हणाले की, नंगारा वाद्य आकाराची प्रतिकृती असलेल्या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचे काम पूर्ण झाले आहे. या बंजारा समाजाच्या नंगारा विरासासाठी शासनाकडून ३७६ कोटी रुपयांच्या निधीचा खर्च झालेला असून पाच मजली इमारत उभी झाली आहे. विविध प्रकारच्या १३ मजली गॅलरीतून बंजारा समाजाच्या संस्कृती व परंपरेचे दर्शनी सेवा भक्तांना होणार आहे.
त्यामुळे या (Banjara Heritage Museum) लोकार्पण सोहळ्याचे समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहुन साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले. यावेळी सहविचार कार्यक्रम सभेचे अध्यक्ष प्रेमासिंग नाईक, प्रमुख उपस्थितीत डॉ महेश चव्हाण, पंकजपाल महाराज, जानुसिंग महाराज, विलास राठोड, प्रकाश राठोड, मधुसूदन राठोड, बाबुसिंग नाईक, किसन महाराज, आत्माराम नाईक, अशोक चव्हाण, संजय महाराज आदीसह नायक, कारभारी, सरपंच व समाज बांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गोपाल राठोड यांनी तर प्रास्ताविक आशिष राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल चव्हाण यांनी मानले.