हिंगोली (Hingoli Chandramuni Buddha Vihar) : शहरातील ज्योती नगर भागात असलेल्या व प्रभाग क्रमांक पाच मध्ये येणाऱ्या चंद्रमुनी बुध्द विहाराच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अॅड. राजेश गोटे, भाजपाचे शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, माजी नगरसेवक सदाशिव सुर्यतळ, देविदास चाटसे, सुधाकर मोरे, गंगुबाई भुक्तर, सोनाली देविदास चाटसे, मीना दिपके, गयाबाई दशरथ भुक्तर, प्रियंका पाईकराव, लताबाई तपासे, उत्तमराव धुळे, राहूल बनसोडे, कपील पुंडगे, जोंधळे, लक्ष्मण मनवर, भगवान बलखंडे, ललीता पुंडगे, जयश्री बनसोडे, नंदा पाटील, अश्विनी चट्टे, विवेक चाटसे, सिमा कांबळे, सुमिता शिंदे तसेच यावेळी मोठ्या संख्येने परिसरात नागरीक उपस्थित होते.
