सेलू तालुक्यातील मोरेगांव येथील घटना
सेलू (parbhani news) : तालुक्यातील मोरेगाव (Moregaon Crime) येथे मारोती मंदीरात जेवणाची पंगत चालु असताना मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करीत खून केल्याची घटना सोमवार २९ एप्रिल रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला असुन हल्लेखोरास (parbhani police) पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
भावानेच केला सख्ख्या भावाचा खून
मोरेगाव (Moregaon Crime) येथे मारोती मंदीरात जेवणाची पंगत सुरु असताना सोमवारी मोठा भाऊ राजेभाऊ मारोतराव मगर याने आपल्या सख्खा लहान भाऊ मधुकर मारोतराव मगर वय ३८ याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर वरात मधुकर मगर मयत झाला आहे. दोन्ही भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरुन वाद होता. हा वाद या खूनाचे कारण असावे असे समजते. मयताच्या पत्नी अलका मधुकर मगर वय ३१ हिने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर वय ४३ रा. मोरेगाव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तोंडावर, छातीवर चाकुने हल्ला
दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजेभाऊ मगर यांने मयताच्या गळावर, डाव्या पायावर, तोंडावर व छातीच्या डाव्या बाजुस चाकुचा हल्ला करुन त्याचा खून केला आहे.याबाबत मंगळवार ३० एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता सेलू पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन पोउपनि भाग्यश्री पुरी यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. घटनेनंतर पोउपअधीक्षक सुनील ओव्हाळ, पोनि दिपक बोरसे,सपोनि संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास (parbhani police) पोउपनि अशोक जटाळ करणार असुन त्यांच्या कार्यात पोकॉ सोपान डुबे, पोना माधव कंगने सहकार्य करित आहेत.