अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल; रोख रक्कम, सोन्या – चांदीचे दागिणे लंपास
परभणी (Parbhani Burglary) : गंगाखेड आणि परभणी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या – चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम लंपास केली. सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरातील मुरकूटे कॉलनी येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि मोबाईल मिळून ३५ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. सुरेश पाथरकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीत ज्ञानेश्वर नगर भागात घडली. (Parbhani Burglary) चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोख रक्कम व दागिणे मिळून ५३ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. ज्ञानेश्वर नगरात चोरट्यांनी दोन घरे फोडली. प्रकाश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.