परभणीतील जिंतूर तालुक्यातील चांदजच्या प्रगतशील शेतकरी तुकाराम अंभुरेचा विक्रम
परभणी/जिंतूर (Flower farm) : तालुक्यातील चांदज शेतशिवारातील प्रगतशील शेतकरी तुकाराम अंभुरे यांनी ३ एकर शेतीत झेंडू, निशिगंधा, गलांडा, गुलाब, लिली, काकडा, मोगरा, बिजली इत्यादी (Flower farm) फुलांची शेती करून वर्षाकाठी तब्बल ६ लाखांची लाखांचे उत्पन्न पदरात पाडून घेत असल्याने ते परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श शेतकरी ठरत आहे.
सध्या फुलशेतीमध्ये बरेच शेतकरी नशीब आजमावत असून उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता (Flower farm) फुलशेती करू लागले आहेत. जास्त करून शेतकरी बांधव पॉलिहाऊसमध्ये फुलशेती करण्याला प्राधान्य देतात. पण तालुक्यातील चांदज येथील तुकाराम अंभुरे या 38 वर्षांच्या युवा शेतकऱ्याचे शिक्षण अवघं जेमतेम आहे. पण ते चांदज शेतशिवारात पारंपरिक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा संयोग साधून ते फुलशेतीच्या माध्यमातून वार्षिक 6 लाखांचं उत्पन्न घेतात. पारंपारिक शेतीला फाटा देत नवी वाट निवडणा-या या प्रगतशील व युवा शेतक-याची झेंडू, निशिगंधा, गलांडा, गुलाब, लिली, काकडा, मोगरा, बिजली इत्यादी फुलांची विक्री शहरात तर होतेच सोबतच इतर तालुक्यात ही फुलांची निर्यात केली जाते. लग्न सराई, वेगवेगळ्या सण उत्सवात तसेच नानाविध सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यांमध्ये त्यांच्या फुलांची प्रचंड मागणी असते. त्यांच्या ह्या प्रयोगशील आणि प्रगतशील फुलशेतीची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत दोन वेगवेगळ्या पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. म्हणून ते परिसरासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरत आहे.
फुलांच्या शेतीमध्ये त्या तंत्रांचा अवलंब करा, जे कमी खर्चिक आणि अधिक फायदेशीर आहेत. उदाहरणार्थ, एक हेक्टर जमिनीवर (Flower farm) फुलांची लागवड करण्यासाठी 25 हजार रुपये खर्च केले जातील. यामध्ये फ्लॉवर बियाणे, खत-खत, सिंचन आणि खुरपणी-तणखत खरेदीपासून ते समाविष्ट आहे. शेतकर्यांकडे स्वतःची जमीन आणि उपकरणे असतील तर खत, बियाणे, खते, सिंचन तसेच वाहतूक आणि साठवणुकीवर खर्च होतो. तथापि, सुरुवातीला फ्लोरिकल्चरमध्ये मजुरीचा खर्च कुटुंबातील सदस्यांच्या श्रमाने नियंत्रित केला जाऊ शकतो. जर तुम्ही 3 एकर शेतात व्यावसायिकरित्या फुलशेती केली तर तुम्ही वार्षिक 6 रुपये कमवू शकता.
– तुकाराम अंभुरे, प्रगतशील शेतकरी