नागपूर (Dengue-chikungunya) : शहरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत नसला तरी दिवसभर ढगाळ हवामान, दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक रुग्णांमध्ये ताप, डेंग्यू, झिका आणि (Dengue-chikungunya) चिकुनगुनियाची लक्षणे दिसत आहेत. त्यांना ताप येत असला, तरी चाचण्यांचे अहवाल नकारात्मक येत आहेत. खाजगी रुग्णालयांतर्फे (Nagpur Municipal) महापालिकेला प्रत्येक डेंग्यू रुग्णाची माहिती दिली जाते.
मात्र, (Nagpur Municipal) पालिकेकडे काही नमुनेच चाचणीसाठी पाठविले. ‘एनआयव्ही’ मध्ये जातात. चाचणी झालेलेच निकाल महापालिका ग्राह्य धरते. त्यामुळे (Dengue-chikungunya) डेंग्यू रुग्णांची संख्या कमी दिसते. डेंग्यूसाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. अॅण्टिजन आणि अॅण्टिबॉडी या चाचणीची किंमत साधारणत ५०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. पीसीआर चाचणीची किंमत दोन ते पाच रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक रुग्णाला पीसीआर चाचणी परवडत नसल्याने खाजगी अॅण्टिजन आणि अॅण्टिबॉडी या चाचण्या करण्यासाठी रुग्णांना सांगितले जाते.
महापालिकेची (Nagpur Municipal) आकडेवारी कमी असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांसह संशयित रुग्णांवरदेखील पालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. सध्या दवाखान्यांमध्ये (Dengue-chikungunya) तापाच्या रुग्णांची गर्दी वाढत आहे. महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या दरम्यान, साथीच्या आजारांचा सर्वाधिक परिणाम पाच वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठांवर होत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.
प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक
फुलदाण्या, टेरेस गार्डनमधील कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नये. घरात पाणी साठवलेली भांडी स्वच्छ ठेवावी. घराभोवती खड्डे ठेवू नये, खिडक्यांना जाळ्या बसवाव्या. (Dengue-chikungunya) डास नियंत्रक उपकरणे वापरावी. लांब बाह्यांचे कपडे घालावे. घराच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. थंडी वाजून ताप येणे, गुडघेदुखी, तीव्र सांधेदुखी, सांधे सुजणे, सांध्यांची हालचाल वेदनादायी होणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, मळमळणे ही आजाराची लक्षणे आहेत.