सुरक्षारक्षकांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन
नांदगाव पेठ (Toll security guards) : जीवाची बाजी लावत टोल नाक्याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर असून मागील दहा वर्षांपासून अल्पशा मानधनावर काम काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी अखेर रविवारी टोल नाक्यावर एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. (Toll security guards) टोल नाका व्यवस्थापकांनी तूर्तास आश्वासन देऊन सुरक्षा रक्षकांना ३१ ऑगस्ट पर्यंत समस्या निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे सायंकाळी सर्व सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यावर पूर्ववत झाले.
दहा वर्षांपासून वेतनवाढ नाही
येथील आयआरबी टोलनाक्यावर मागील दहा वर्षांपासून अगदी तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. आजच्या महागाईच्या काळात सुद्धा डोळ्यात अंजन घालून जीवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांना केवळ ९८०० रुपये एवढ्या अल्पशा वेतनावर काम करावे लागत आहे. यामध्ये सुद्धा दहा महिन्यांची पीएफ रक्कम खात्यात जमा करण्यात आली नसल्याने संतप्त (Toll security guards) सुरक्षारक्षकांनी सकाळपासून टोल नाक्यावर काम बंद आंदोलन सुरू केले. आपल्या हक्काच्या वेतनवाढीसाठी तसेच अन्य सुविधांसाठी सुरक्षारक्षकांनी बंद पुकारल्यानंतर टोल व्यवस्थापक गायकवाड यांनी वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करून ३१ ऑगस्ट पर्यंत मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरक्षारक्षकांना वेळ मागितला व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनतर सायंकाळी सर्व (Toll security guards) सुरक्षारक्षकांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेऊन कर्तव्यावर पूर्ववत झालेत. यावेळी रामेश्वर कोठार,प्रफुल इंगोले, कैलाश आठवले, कोमल वाघमारे, प्रवीण श्रीनाथ, सतीश सवईकर, मनोज गडलिंग, अतुल हिवे,अतुल गडलिंग, निलेश कापडे, निलेश घोडेस्वार ,हर्षद कापडे, प्रेमचंद खंडारे, प्रकाश नेमाडे,दुर्वेश जोगे, अक्षय किर्तकार, नितीन नांदणे, मुकेश चौहान, निकेश तराले, आर. आर .इंगोले, संदीप भगत, राजेंद्र इंगोले, राजेश तायडे, राजेंद्र इंगळे आदी सुरक्षारक्षक या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते.