परभणी (Parbhani):- रक्तदान (blood donation) सर्वश्रेष्ठ दान आहे. जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचविण्यासाठी पुढे यावे. रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिरांचे(camps) आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.
सद्या रक्तकेंद्रात थॅलेसेमिया (Thalassemia) व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकास रक्तपिशवी मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यातील विविध समाज घटक, सामाजिक संस्था, विविध पक्ष-पदाधिकारी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रक्तकेंद्रास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक(District Surgeon) डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.