शेगाव ( Winter Cold) : वातावरणातील उकाडा वाढला असुन परिसरातील शेकोट्या कमी झाल्या आहेत त्यामुळे भर हिवाळ्यात थंडी गायब झाली असून थंडी आता ८ डिसेंबर नंतर मी पुन्हा येईन असे म्हणतांना हवामान विभागाव्दारे म्हणत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३१ तर पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ डिग्रीने अधिक म्हणजे २० आहे. तर मुंबईसह कोकणात दुपारचे किमान तापमान ३१ ते ३४ तर पहाटेचे किमान तापमान २४ ते २६ आहे. त्यामुळे जिल्हयात (Winter Cold) एकाकी थंडी कमी झाली आहे. तापमान ५ ने वाढले असून, हवामानात बदलामुळे कमी झालेली थंडी आता ८ डिसेंबरनंतर पुन्हा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून प्राप्त झाली आहे.
चेन्नईमध्ये आलेल्या फिंजल चक्रीवादळाचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यात ७ डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहील. शिवाय सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. ८ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, (Winter Cold) हळूहळू पुन्हा थंडीला सुरूवात होईल. ८ ते १३ डिसेंबरपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील पहाटेच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ डिग्रीपर्यंत घसरू शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी अंदाज व्यकत केला आहे.