परभणी(Parbhani):- महावितरणच्या निष्क्रीय कारभाराविरोधात माजी मनपा सदस्य सुशील कांबळे यांच्या नेतृत्वात शुक्रवार २८ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. रोहित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने वीज पुरवठा(Power supply) खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
महावितरणच्या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कामाकडे दुर्लक्ष होत आहे. पीसी ३ वर्कशॉप फिडरवरील(Workshop feeder) रोहित्रांच्या वीज पुरवठा दिवसांतून कित्येक वेळा खंडित होत आहे. या भागात ३० ते ३५ रोहित्र येतात. वीज पुरवठा नसल्याने सामान्य नागरीकांसह रुग्ण, विद्यार्थी, महिला, लहान मुले यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागण्यांकडे वेधले लक्ष
नियमित अधिकारी द्यावा, रोहित्रांची दुरुस्ती करावी, फिडरवर ट्रिप अलार्म बसवावे, वाकलेले, जीर्ण झालेले विद्युत पोल बदलावेत आदी मागण्यांकडे लक्ष वेधत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला सुशील कांबळे, वहिद पटेल, शेख रफिक, बादल भैय्या, रहिमोद्दिन अन्सारी, हरिबाई कांबळे, सुशीला निसर्गन, वत्सलाबाई गायकवाड, कस्तुराबाई कांबळे, विठ्ठल बुचाले, नवनाथ जोंधळे, संभाजी दाळपुसे, तातेराव वाळवंटे, एस.पी. चने, भाग्यवंत, बबन सुर्यवंशी, एस.के. रिजवान, राहूल आगाम, अनिस कदम, आकाश जाधव, नागोराव भाळशंकर, हिरामन मोरे, बबन वावळे, बुध्दपाल कांबळे, राहूल पोटभरे, राहूल खिल्लारे, बबन भालेराव, दिलीप घुगे, जनार्धन नंद, बाबा साळवे, दिलीप वाकळे, अस्लम अन्सारी, तुळशीराम वाघमारे, सखाराम बगाटे, प्रभु गिरी, राजरत्न सावंत, सचिन फुलवरे यांच्या सह परिसरातील रहिवाशांची उपस्थिती होती.