बाजार समितीतील टिनशेड व्यापारी गाळे प्रकरण
परभणी/पाथरी (Parbhani Bazar Samiti) : कृऊबास परिसरात कापूस व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेली दुकाने काढण्याबाबतचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने मागे घ्यावा, जमा केलेल्या रकमेची पावती द्यावी व गाळ्याचे भाडे नियमित घेणे या मागण्यासाठी सोमवार पासुन कापूस व्यापारी तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाकर्ते कापूस व्यापाऱ्यांनी या बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आले असून यात त्यांनी कापूस व्यवसाय करण्यासाठी (Parbhani Bazar Samiti) बाजार समितीने २९ अक्टोबंर २०२० रोजी यार्डातील मोकळी जागा भाडेतत्त्वावर दिली होती. यासाठी अकरा महिन्याचा करार करून प्रत्येकी तीन लाख रुपये अनामत रक्कम व चार लाख रुपये टिनशेड उभारणी साठी घेतल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यापासून बाजार समिती आमच्या कडून गाळा भाडे घेत नसून आम्हाला टिनशेड काढून जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असुन कापूस व्यवसाय करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेली दुकाने काढण्याबाबतचा निर्णय (Parbhani Bazar Samiti) बाजार समिती प्रशासनाने मागे घ्यावा, जमा केलेल्या रकमेची पावती द्यावी व गाळ्याचे भाडे नियमित घेणे या मागण्यासाठी सोमवार १७ मार्च पासुन कापूस व्यापारी तहसील कार्यालया बाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
जिल्हा उप निबंधक यांच्या आदेशाने गाळा रिकामे करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. कापूस व्यापारी तीन लाख रुपये अनामत रक्कमेची पावती मागत आहेत परंतु त्या बाबत बाजार समितीच्या अभिलेख्यात रक्कम जमा झाल्याची कुठलीच नोंद नाही. सदरलील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे व्यापारी यांनी म्हटले असले तरी यासंदर्भात पाथरी कृषी उत्पन्न (Parbhani Bazar Samiti) बाजार समिती कार्यालयास कोणतीही नोटीस मिळालेली नाही.
– अनिल नखाते, सभापती, बाजार समिती, पाथरी