तलाठी संतोष पवार यांच्या खून प्रकरणाचे राज्यभर उमटले पडसाद
हिंगोली (Talathi Sangh) : वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची बुधवारी तलाठी कार्यालयातच निर्घृणरित्या हत्या केल्याचे पडसाद राज्यभर उमटले. गुरूवारी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन राज्यभर करण्यात आले. म.रा.तलाठी संघ (Talathi Sangh) जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने आज ३० ऑगस्टपासून जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
तलाठी संतोष पवार हे २८ ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज करीत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने भोसकून त्यांचा खून केल्याने महाराष्ट्र राज्य (Talathi Sangh) तलाठी संघाच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी निषेध नोंदविण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. संतोष पवार यांची कोणतीही चूक नसताना केवळ संशयावरून त्यांची हत्या केल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.
या (Talathi Sangh) घटनेमुळे जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचार्यांत भितीचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्याचाच परिणाम शासकीय कामकाजावर होऊ शकतो. त्यामुळे या घटनेचा तपास एसआयटीमार्फत करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात विशेष सरकारी विधीज्ञांमार्फत चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, संतोष पवार हे शासकीय कामकाज करीत असताना त्यांची हत्या झाल्याने व ते स्वत: कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ एक रकमी ५० लाख रूपयाची मदत त्वरीत जाहीर करावी, भविष्यात त्यांच्या कुटुंबियाच्या उदर निर्वाहासाठी त्यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपावर शासकीय सेवेत समाविष्ट करून द्यावे, राज्यात भा.न्या.स.कलम १३२ अजामीन पात्र गुन्हा हा जामीन पात्र करण्यात आला आहे तो परत अजामीन पात्र करून शासकीय कर्मचार्यांना न्याय व सुरक्षा देण्याबाबत विचार करावा.
ही घटना अतिरीक्त सज्जावर कार्यरत असताना घडल्याने व काही तलाठी, मंडळ अधिकारी यापूर्वी निलंबित असल्याने त्यांना तात्काळ कामावर रूजू करून घ्यावे व रिक्त पदे भरावीत अशी मागणी म.रा.तलाठी संघाने (Talathi Sangh) केली असून या मागण्या मान्य होईपर्यंत ३० ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष विनोद ठाकरे, सचिव विनायक किन्होळकर यासह आंनद दातार, एन.जे.शर्मा, ए.एस.जाधव, गजानन शिंदे, व्ही.बी.सोमटकर, एन.एस.गुड्डलवाड, पी.एस. पांडे, ए.एन. गंगावणे, सी.ए.धुमाळ, एन.डी.नाईक, पी.डी.इंगोले आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
आडगाव रंजेबुवा सज्जाचे तलाठी संतोष पवार यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. २९ ऑगस्टला राज्यभर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटने तर्फे ही निषेध नोंदविला. या (Talathi Sangh) घटनेबाबत २९ ऑगस्टला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटेचे दिलीप कदम यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून अशा सामाजिक प्रवृत्तीच्या विरूद्ध निषेध नोंदविण्यात आला आहे.