कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
नागपूर (Butibori municipal council) : नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत दि २९ ऑगस्ट पासून बुटीबोरी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. सदर संपात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी/ कर्मचारी व नगरपरिषद कर्मचारी सहभागी आहेत. कर्मचा-यांच्या मुलभूत मागण्या व समस्या शासनाने सोडविल्या नाही, असे कर्मचा-यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील राज्य संवर्ग ३००० अधिकारी व स्थानिक ६०००० वर कर्मचारी यांना अद्यापही राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. (Butibori municipal council) काही कर्मचारी/अधिकारी मृत पावल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पेन्शन व इतर लाभ मिळू शकले नाही.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे
- १) जुनी पेंशन/NPS/UPS लागू करून तात्काळ अंमलबजावणी करणे.
- २) न.प. कर्मचारी यांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.
- ३) आगाऊ वेतन अनुदान एक महिना अगोदर देणे.
- ४)सेवानिवृत्ती वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश सहायक अनुदान मध्ये करण्यात यावा.
आदी मागण्या मान्य करणेकरिता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद् सफाई कामगार संघटना यांनी एकत्रितपणे शासनाकडे त्यांच्या मागण्या मान्य करणेकरिता निवेदन दिले परंतु सदर संपातील मागण्या कडे दुर्लक्ष करून कारवाई करणेबाबतचा निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर असंतोष निर्माण झालेला आहे. (Butibori municipal council) नगरपरिषद बुटीबोरी यांच्या वतीने आनंद नागपुरे लेखाधिकारी, नेहा पोतले अभियंता, मिलिन पाटील अभियंता, ममता दाते अभियंता, अभय गुटाळ अभियंता, रोहित शेलारे अग्निशमन अधिकारी, दुर्गेश खडतकर लिपिक, पूजा नक्षीने लिपिक सम्यक दुधे लिपिक, विकी ठाकरे लिपिक, रवींद्र काळबांडे लिपिक, विशाल दुधे लिपिक, स्नेहा वरभे लिपिक, प्रवीण कारेकार लिपिक प्रभाकरजी गेडाम शिपाई, मुक्तार सय्यद शिपाई यांनी संपात सहभागी होऊन बेमुदत संप पुकारला आहे.