पातूर (Old pension Yojana) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेन्शन लागू करण्याकरिता आजपासून बेमुदत संप करण्यात आला आहे. पातूर नगरपरिषद संलग्नित कर्मचारी यांनी (Old pension Yojana) जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून संप पुकारला आहे. शासनाच्या अंतर्गत (municipal council) नगरपरिषद नगरपंचायत मधील 2005 नंतरचे अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेले नाही.
तसेच जुनी पेन्शन योजना (Old pension Yojana) बंद करण्यात आलेले असल्यामुळे राज्यसंवर्गातील जवळपास 3000 अधिकारी आणि स्थानिक स्थापना वरील 60000 कर्मचारी संवर्गामध्ये कमालीचा असंतोष आहे. विविध मागणीसाठी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने शासनाचे वारंवार पाठपुरावा करून शासनाने कोणत्याही प्रकारचे दखल न घेतल्यामुळे आज पातुर (municipal council) नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आशिष भगत नगरपरिषद संवर्धन अधिकारी संघटना अध्यक्ष पातूर शाखा, महेश राठोड उपाध्यक्ष भूषण रोकडे, सदस्य सुरज कुमार ताथोडे, संपात सहभागी असून त्यांना स्थानिक नगर परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष रसूल भाई यांनी संघटनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा दर्शविलेला आहे.