भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Independence day) : भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात स्थित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस ध्वजारोहणानंतर (Independence day) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन संबोधित केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त (Independence day) आयोजित मुख्य शासकीय समारंभ आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. तत्पूर्वी, सकाळी, ७.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उच्च न्यायालयामध्ये न्यायालय परिसरात सकाळी ७.३० वाजता तर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहण (Flag hoisting) झाले. तसेच जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या नागपूर स्थित विविध कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.