केंद्रा बु/हिंगोली (Independence Day) : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथून जवळ असलेल्या ताकतोडा येथील महिला सरपंच जया शिवाजी मानमोठे (Sarpanch Jaya Manmothe) यांना स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणार्या (Independence Day) ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्र सरकार मार्फत आल्याचे सेनगावचे गटविकास अधिकारी व्ही एस भोजे यांनी पत्रद्वारे कळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या ताकतोडा या छोट्याशा गावातील महिला सरपंच जया शिवाजी मनमोठे यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र शासन द्वारे जिल्हा परिषद हिंगोली पंचायत समिती सेनगाव मार्फत त्यांनाही विशेष निमंत्रण मिळाले असून केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने जया शिवाजी मानमोठे (Sarpanch Jaya Manmothe) व त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली येथील (Independence Day) ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
जया शिवाजी मानमोठे (Sarpanch Jaya Manmothe) ह्या १३ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे दाखल होणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी महिलेच्या प्रश्नावर एका कार्यक्रमात सहभागी होऊन त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणार्या (Independence Day) ध्वजारोहण दिनी समारंभात सहभागी होणार आहेत. एकंदर जया मानमोठे यांना दिल्लीचे निमंत्रण आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.