आपत्ती व्यवस्थापनातील कार्याची दखल
कारंजा/वाशिम ( Independence day) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरुषोत्तम भगत यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचा 15 ऑगस्ट रोजी अमरावती येथील आयुक्त कार्यालयात सत्कार करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शाहू भगत यांचा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय , पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे , जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधीक्षक, महसूल उपायुक्त संजय पवार यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाशीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केल्याने नाव लौकीक मिळवला आहे. त्यामुळे त्यांचेवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.