वसमत तालुक्यातील गणेशपुर येथील घटना
वसमत (Independence Day) : तालुक्यातील गणेशपुर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त फडकलेला ध्वज रात्री उशिरापर्यंत तसाच राहिला ध्वज उतरवण्याचे मुख्याध्यापक विसरून गेले रात्री उशिरा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला या घटनेने खळबळ उडाली आहे रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुखांनी ध्वज उतरवला आहे या ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे.
ध्वजारोहण करून शिक्षक झाले गायब
वसमत तालुक्यातील गणेशपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या निष्काळजीपणाचा कळस ठरणारी घटना गुरुवारी समोर आली एवढे निष्काळजी शिक्षक व मुख्याध्यापक असतील तर शिक्षणाचा कसा खेळखंडोबा सुरू असेल असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (Independence Day) स्वातंत्र्यदिना निमित्त वसमत तालुक्यातील गणेशपुर येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांनी सकाळी ध्वजारोहण केले नियमाप्रमाणे सायंकाळी सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज उतरवणे बंधनकारक असते; मात्र मुख्याध्यापक ध्वजारोहण करून गावातून निघून गेले ते पुन्हा परतलेच नाहीत त्यांना राष्ट्रध्वज उतरवण्याच्या कामाचा विसर पडला. राष्ट्रध्वज उतरवण्याची वेळ टळून गेली तरी जिल्हा परिषद शाळेसमोर ध्वज फडकत असल्याचे दिसले व एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागाला पोलिसांना सूचना देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ध्वज फडकत असल्याने शाळेजवळ ग्रामस्थांची गर्दी जमा झाली होती घडलेला प्रकार समजतात शिक्षण विभागाचे कर्मचारी अधिकारी गणेशपुर येथे रात्री दाखल झाले वसमत ग्रामीण पोलिसांची अधिकारी कर्मचारीही दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुखांनी राष्ट्रध्वज रात्री साडेआठ वाजता उतरवला.
या घटनेनंतर गावकर्यांनी रात्री वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकारासंदर्भात तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशपुर येथील ग्रामस्थांची गर्दी होती पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
असे निष्काळजी शिक्षक गावात पाठवू नका ग्रामस्थांचा संताप
गणेशपुर येथे (Independence Day) राष्ट्रध्वज न उतरता गायब होणारे निष्काळजी शिक्षक पुन्हा आमच्या गावात पाठवू नका या शिक्षकांमुळे गावातील शिक्षणाचा व शाळेचा खेळखंडोबा झाला आहे त्यामुळे यांना पुन्हा गावात पाठवू नका चांगले शिक्षक द्यावेत अशी मागणी करण्यासाठी गणेशपुर येथील ग्रामस्थ शुक्रवारी वसमत येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात व गटविकास अधिकारी कार्यालयात आले होते त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिक्षण विभागाचे अधिकार्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करून दुसरे शिक्षक गावात नियुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.तात्पुरती कारवाई करून पुन्हा हेच शिक्षक गावात पाठवणार असाल तर आम्ही सहन करणार नाही पुन्हा या शिक्षकांना गावात पाठवू नका असा पवित्त्रा ग्रामस्थांनी घेतला आता या प्रकरणी संबंधित शिक्षकांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.