मुंबई (Hurun India) : ॲक्सिस बँकेचा प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय 2024 बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया 500 यांनी ‘2024 बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500’ ची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. ही यादी भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आहे. सूचीबद्ध कंपन्यांसाठी मार्केट कॅपिटलायझेशन आणि बिगर-सूचीबद्ध कंपन्यांसाठी मूल्यांकन यानुसार या (Hurun India) कंपन्यांची क्रमवारी त्याच्या मूल्यावर आधारित आहे. या यादीमध्ये केवळ भारतात मुख्यालय असलेल्या कंपन्या समाविष्ट आहेत. यात सरकारी कंपन्या आणि परदेशी तसेच भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्या समाविष्ट नाहीत.
‘2024 बरगंडी प्रायव्हेट (Hurun India) हुरुन इंडिया 500’ यादी मध्ये समाविष्ट होण्यासाठी 13 डिसेंबर 2024 पर्यंतच्या निर्धारित वेळेत कंपन्यांचे किमान मूल्य 9,580 कोटी रु. (1.1 अब्ज अमेरिकन डॉलर) असणे आवश्यक आहे. या यादीतील कंपन्यांचे सरासरी कार्यात्मक कालावधी 43 वर्षे आहे. या (Hurun India) यादीतील सर्व 500 कंपन्यांचे एकत्रित मूल्य 324 लाख कोटी रु. म्हणजेच 3.8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, बीएसई सेन्सेक्स मध्ये 27%, निफ्टी 50 मध्ये 30% वार्षिक वाढ (वर्ष) झाली, तर एस अँड पी बीएसई 500 मध्ये 38% वाढ झाली आहे.