मोदी सरकारचा AI साठी अर्थसंकल्प किती? जाणून घ्या…5 मोठी आव्हाने
नवी दिली (India AI Vs China) : पॅरिसमध्ये झालेल्या AI समिटला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित होते. येथे त्यांनी सांगितले की, “AI या शतकासाठी मानवतेचा कोड लिहित आहे” आणि भारत या बदलात आपली भूमिका बजावण्यास तयार आहे. पण प्रश्न असा आहे की, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करू शकेल का? AIच्या क्षेत्रात भारत, चीन आणि अमेरिकेचे स्थान काय आहे? भारत खरोखरच AI सुपरपॉवर (AI superpowers) बनू शकेल का? जाणून घेऊया भारताची सद्यस्थिती, त्याचे बजेट आणि भविष्यातील योजना…
What do you want to create next? pic.twitter.com/L3UZyXPeTC
— OpenAI (@OpenAI) February 10, 2025
AI मध्ये भारत विरुद्ध चीन विरुद्ध अमेरिका:
अमेरिका: एआयमध्ये जागतिक आघाडीवर
- AI संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषात आघाडीवर
- 2023 मध्ये 20 अब्ज डॉलर्स (₹1.66 लाख कोटी) पेक्षा जास्त गुंतवणूक
- AI स्टार्टअप्समध्ये जगातील सर्वात मोठी गुंतवणूक
- OpenAI (ChatGPT) , Google DeepMind, Tesla AI सारख्या कंपन्यांद्वारे जगावर वर्चस्व
चीन: वेगाने उदयास येणारी एआय महासत्ता
- AI पेटंट फाइलिंगमध्ये जगात नंबर 1
- 2023 मध्ये 10 अब्ज डॉलर्स (₹83,000 कोटी) ची गुंतवणूक
- चॅटजीपीटीशी स्पर्धा करणाऱ्या डीपसीक सारखे AI मॉडेल लाँच
- 2030 पर्यंत AI मध्ये जागतिक नेता बनण्याची योजना
भारत: सुरुवातीचा पण वेगाने वाढणारा देश
- 2023-24 मध्ये AI वर फक्त ₹170 कोटींची गुंतवणूक
- 2025-26 साठी ₹2,200 कोटी (सुमारे $0.27 अब्ज) बजेट
- AI स्वीकारण्यात आघाडीवर
- सरकार 6 कंपन्यांच्या सहकार्याने भारतीय AI चॅटबॉट विकसित
भारताच्या एआय विकासासमोरील 5 मोठी आव्हाने:
कमी बजेट: अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत AI वर खूपच कमी खर्च करत आहे.
संशोधनात विलंब: भारतात AI संशोधन कमी आहे आणि जागतिक पेटंट मर्यादित आहेत.
तंत्रज्ञान कंपन्या मागे: भारतात Google, OpenAI आणि Baidu सारख्या मोठ्या AI कंपन्यांसारखी कोणतीही मोठी AI कंपनी नाही.
डेटा सुरक्षा आणि नीतिमत्ता: भारतात अजूनही AIशी संबंधित डेटा सुरक्षा आणि नीतिमत्तेबद्दलचे धोरण विकसित होत आहे.
हार्डवेअर पायाभूत सुविधांचा अभाव: भारतात Semiconductor आणि GPU (Graphics processing unit) उत्पादन अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
एआय संदर्भात भारत सरकारच्या नवीन योजना आणि गुंतवणूक:
इंडियाएआय मिशन: 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक
- एप्रिल 2024 मध्ये सुरू झालेले हे अभियान भारतात AI चा अवलंब वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते.
- स्टार्टअप्स आणि संशोधकांना AI पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
- कृषी आणि आरोग्यसेवा क्षेत्रात AI ला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
एआय केंद्रांचा विस्तार: 200 कोटी रुपयांचे बजेट
- प्रशासन आणि सरकारी योजनांमध्ये AI आणण्याची योजना.
- AI संशोधनासाठी 3 नवीन उत्कृष्टता केंद्रे (CoE) स्थापन केली जातील.
डीप टेक्नॉलॉजी फंड: ₹ 20,000 कोटींची गुंतवणूक
- AI, बायोटेक, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर आणि नॅनोटेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी.
GPU एक्सेस: भारतीय स्टार्टअप्ससाठी एक मोठी संधी
- सरकारने AI स्टार्टअप्सना GPU (Graphics processing unit) मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
- GPU च्या कमतरतेमुळे भारतीय स्टार्टअप्स मोठे AI मॉडेल तयार करू शकले नाहीत.
शिक्षण आणि एआय प्रतिभा विकास
- सरकार 500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून AI शिक्षणासाठी एक नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करणार आहे.
- शाळा आणि महाविद्यालयांमध्ये AI अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
2027 पर्यंत भारत बनणार एआय सुपरपॉवर?
2027 पर्यंत AIवरील गुंतवणूक (अंदाजित आकडेवारी):
अमेरिका: ₹42 लाख कोटी ($500 अब्ज)
चीन: ₹12लाख कोटी ($150 अब्ज)
भारत: ₹4 लाख कोटी ($50 अब्ज)
भारताची ताकद:
भारतात जगातील सर्वात मोठा AI टॅलेंट पूल आहे.
भारतात AIचा सर्वाधिक वापर केला जात आहे.
स्वस्त डेटा किमती आणि डिजिटल क्रांतीमुळे AI चा जलद विकास शक्य झाला आहे.
भारताच्या कमकुवतपणा:
AI पेटंट आणि संशोधनात अमेरिका आणि चीनपेक्षा अजूनही खूप मागे आहे.
AI पायाभूत सुविधा आणि हार्डवेअर उत्पादनाचा अभाव.
खाजगी कंपन्या आणि सरकारमध्ये समन्वयाची गरज आहे.