IND vs SL Live Score:- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना (ODI match) आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाईल. पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर श्रीलंकेने दुसरी वनडे जिंकली.
यजमान संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. शेवटची वनडे जिंकून भारताला बरोबरी साधायची आहे. T20 मध्ये क्लीन स्वीपचा सामना केल्यानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन (comeback) केले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावसंख्येचा बचाव करताना शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या वनडेत भारताचा ३२ धावांनी पराभव झाला. श्रीलंकेसाठी एकदिवसीय मालिका आतापर्यंत उत्कृष्ट(Excellent) राहिली आहे. त्याचबरोबर भारताला शेवटची वनडे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.
