सरकारने 119 चिनी ॲप्सवर घातली बंदी…पहा संपूर्ण यादी
नवी दिल्ली (India Banned Apps) : केंद्र सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक करत 119 चिनी ॲप्सवर (Chinese Apps) बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, जर मोबाईलमध्ये व्हिडिओ चॅटसह नमूद केलेले ॲप्स देखील इन्स्टॉल केले असतील, तर ते ताबडतोब काढून टाकण्याचा इशारा (India Banned Apps) देण्यात आला आहे. कारण, हे ॲप तुमच्यासाठी सुरक्षित नाही. सरकारने गुगल प्ले स्टोअरला (Google Play Store) हे अॅप्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
तुमच्या मोबाईलमध्येही हे ॲप्स आहेत का?
बंदी घातलेल्या बहुतेक अॅप्समध्ये (Google Play Store) गुगल प्ले स्टोअरवर सूचीबद्ध असलेले व्हिडिओ आणि व्हॉइस चॅट अॅप्स समाविष्ट आहेत. यापैकी काही ॲप्स प्ले स्टोअरवर दहा लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत. पण आता केंद्र सरकारने हे अॅप्स काढून टाकण्याचा आदेश जारी केला आहे. अहवालानुसार, या (Chinese Apps) ॲप्समुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला होता. सरकारने वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल फोनमधून हे (India Banned Apps) ॲप्स तात्काळ डिलीट करण्याचा इशाराही दिला आहे.
परदेशातून चालवले जातात हे अॅप्स
माहितीनुसार, हे अॅप्स चीन (Chinese Apps) आणि हाँगकाँगमधून ऑपरेट केले जात होते. या व्यतिरिक्त, काही ॲप्स सिंगापूर, अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियन डेव्हलपर्सचे होते. हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका बनू शकतात. या अॅप्सद्वारे आपली वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. अशा परिस्थितीत, केंद्र सरकारने आयटी कायदा (IT Act) 69A अंतर्गत त्यांच्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, यामध्ये सार्वजनिक प्रवेशावर (India Banned Apps) बंदी घालण्यात आली आहे, म्हणजेच वापरकर्ते ते डाउनलोड करू शकणार नाहीत.
कोणत्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली?
या (Chinese Apps) अॅप्सची काही नावे समोर आली आहेत, जसे की चिलचॅट (Chilchat), चांगॲप आणि हनीकॅम (Honeycam). चिलचॅट हे सिंगापूरमधील एका कंपनीने तयार केलेले (Video chat) व्हिडिओ चॅट आणि गेमिंग ॲप (Gaming apps) आहे. चांग ॲप हे चीनमध्ये बनवलेले ॲप आहे आणि हनीकॅम हे ऑस्ट्रेलियन कंपनीचे फोटो आणि व्हिडिओ ॲप (Video App) आहे. जरी हे अॅप्स वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांनी तयार केले असले तरी, सरकारला भीती आहे की, त्यांचा डेटा चीनपर्यंत पोहोचत आहे, ज्यामुळे आपल्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
बंदी घातलेल्या अॅप्सचा धोका काय?
डेटा चोरी: हे (Chinese Apps) ॲप्स आपल्या फोनवरून आपले संदेश, फोटो, व्हिडिओ आणि स्थान यासारखी वैयक्तिक माहिती चोरू शकतात.
हेरगिरी: ही माहिती आमच्यावर हेरगिरी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
सायबर हल्ले: या (Chinese Apps) अॅप्सचा वापर आपल्या देशावर सायबर हल्ले (Cyber attacks) करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
ॲप्सबाबत ही काळजी घेणे महत्वाचे
- जर फोनमध्ये यापैकी कोणतेही ॲप्स असतील तर ते ताबडतोब अनइंस्टॉल करा.
- कोणतेही अनोळखी ॲप डाउनलोड (App Download) करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करा.
- वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा आणि तुमची संवेदनशील माहिती कोणत्याही (India Banned Apps) ॲपला देणे टाळा.
- फक्त प्ले स्टोअर (Google Play Store) सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडूनच ॲप्स डाउनलोड करा.