नवी दिल्ली/मुंबई (Budget 2024 Gold Rate) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी मोदी सरकारचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. सोन्या-चांदीबाबत या अर्थसंकल्पात (Budget 2024) मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर (Gold rate Today) सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या अखेरीस सोन्याचा भाव सुमारे 4000 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15% वरून 6% करण्यात आले आहे. या कपातीमुळे किमतीत मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना फायदा झाला असून, बाजारात मागणी वाढली आहे.
येथे CLICK करा: अर्थसंकल्पात गरीब कुटुंबांसाठी 3 कोटी घरे
सोन्याचा नवीनतम दर काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6% वाढवल्याने, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 72,838 रुपयांवरून 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आणि 4,000 रुपयांची घसरण नोंदवली. (Budget 2024) एमसीएक्सवर चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली. ती 88,995 रुपयांवरून 84,275 रुपये प्रति किलोपर्यंत घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold rate Today) सोन्याचा भाव प्रति किलो 2,397.13 डॉलर इतका राहिला आहे.
सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?
ऑगमॉन्ट – गोल्ड फॉर ऑलचे संचालक सचिन कोठारी यांनी सराफा उद्योगासाठी (Budget 2024) एक सकारात्मक विकास म्हणून या कपातीचे वर्णन केले. ते म्हणाले की, कस्टम ड्युटी 15% वरून 6% पर्यंत कमी करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. 5% कपात अपेक्षित असताना, प्रत्यक्षात 9% ची कपात प्रशंसनीय आहे. या कपातीमुळे ग्राहकांना (Gold rate Today) कमी दराने सोने खरेदी करता येते. MCX वर सोन्याचा भाव 73,000 रुपयांवरून 69,000 रुपयांपर्यंत घसरला आहे आणि आणखी घसरून 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर येण्याची शक्यता आहे.